दहावीच्या परीक्षेतही कोकण बोर्ड राज्यात अव्वल, कोकण बोर्डाचा निकाल 99.27 टक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत सलग दहाव्यांदा कोकण बोर्डाने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. यंदा कोकण बोर्डाचा विक्रमी निकाल लागला आहे. कोकण बोर्डाचा निकाल 99.27 टक्के लागला आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा 99.20 टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 19.42 टक्के निकाल लागला आहे.

कोकण बोर्डातून दहावीच्या परीक्षेला 30,816 मुले परीक्षेला बसली, त्यापैकी 30,193 मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्यामध्ये 15,763 मुले परीक्षेला बसली. त्यापैकी 15,614 मुले उत्तीर्ण झाली. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 95.05 टक्के आहे. 15,053 मुली परीक्षेला बसल्या. त्यापैकी 14,979 मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.50 टक्के आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून 20,705 मुले परीक्षेला बसली. त्यापैकी 20,540 मुले उत्तीर्ण झाली. रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 99,20 टक्के लागला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून 10,540 मुले परीक्षेला बसली. त्यापैकी 10,425 मुले उत्तीर्ण झाली मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.05 टक्के आहे. 10,165 मुली परीक्षेला बसल्या. त्यापैकी 10,115 मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.50 टक्के आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 10,111 मुले परीक्षेला बसली. त्यापैकी 10,053 मुले उत्तीर्ण झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याची टक्केवारी 99.42 टक्के आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 5,223 मुले परीक्षेला बसली. त्यापैकी 5,189 मुले उत्तीर्ण झाली. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.34 टक्के आहे. 4,888 मुली परीक्षेला बसल्या. त्यापैकी 4,864 मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.50 टक्के आहे. अशी माहिती कोकण विभागीय मंडळाचे प्रभारी विभागीय अध्यक्ष देवीदास कुलाळ यांनी दिली. यावेळी प्रभारी विभागीय सचिव भावना राजनोर उपस्थित होत्या.

वैष्णवी विलास चाळके हिला 99.20 टक्के गुण

शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांची सुकन्या वैष्णवी चाळके हिला दहावीच्या परीक्षेत 99.20 टक्के गुण मिळाले. वैष्णवी ही रा. भा. शिर्के प्रशाला रत्नागिरीची विद्यार्थीनी आहे. पहिलीपासून नवव्या इयत्तेपर्यंत तिने कायम पहिला क्रमांक पटकावला आहे. दहावीत तिने मिळवलेल्या यशाबददल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.