कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 14 रुग्ण आढळले, बाधितांचा आकडा 397 वर

581

कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे 14 रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 397 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शाहूवाडी तालुक्यात 128 रुग्ण आढळले आहेत.

बुधवारी सकाळी आलेल्या 585 पैकी 5 अहवाल कोरोना पॉझीटिव्ह आले आहेत, तर उर्वरित 525 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये सिंधुदुर्गच्या 55 अहवालाचा समावेश आहे. त्यामुळे आज सकाळ पर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 397 होती. यामध्ये सर्वाधिक शाहूवाडी तालुक्यात 128 रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.

दरम्यान आज सकाळपर्यत प्राप्त पॉझीटिव्ह अहवालात गडहिंग्लज-2, शाहूवाडी-9, भुदरगड-1 तसेच सोलापूरहुन आलेल्या दोघांचा समावेश आहे. तर आज अखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे-

आजरा -32, भुदरगड-50, चंदगड -25, गडहिंग्लज-15, गगनबावडा-6, हातकणंगले-4, कागल-11, करवीर -11,ब्पन्हाळा-20, राधानगरी- 48, शाहूवाडी- 128, शिरोळ-5 तर नगरपरिषद- 10 आणि कोल्हापूर महापालिका क्षेत्र – 20 असे एकूण 377 तसेच पुणे-1, सोलापूर-2, कर्नाटक -2 आणि आंध्रप्रदेश -1, इतर जिल्हा व राज्यातील 5 असे मिळून एकूण 397 रुग्ण संख्या झाली.

आपली प्रतिक्रिया द्या