कोल्हापूर – दोन महिन्यात पहिल्यांदाच बाधितांचा आकडा 50 च्या खाली

तब्बल दोन-अडीच महिन्यानंतर जिल्ह्यात आज प्रथमच कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५० च्या आत आली आहे. गेल्या २४ तासांत अवघे ३४ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण बाधीतांची संख्या ४७ हजार ७४२ वर पोहोचली आहे.

गेल्या २४ तासांत कोरोनामुक्त झालेल्या ६३० जणांना घरी सोडण्यात आले आहे.आतापर्यंत एकूण ४४ हजार ७५८ कोरोना मुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासांत ८ व आतापर्यंत १ हजार ६२९ बाधीतांचा मृत्यू झाला आहे.‌ सध्या एकूण १ हजार ३५५ पॉझीटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन मिळाली.

दरम्यान, कोरोनाचे हाॅटस्पाॅट ठरलेल्या कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात-१३, इंचलकरंजीसह इतर नगरपालिका क्षेत्रात-३ तर करवीर-५, हातकणंगले -४, गडहिंग्लज-२ आणि आजरा, कागल, राधानगरी व शिरोळ तालुक्यात प्रत्येकी १ असे नवे कोरोना बाधीत रुग्ण गेल्या २४ तासांत आढळले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या