कोल्हापूर- 75 वर्षीय संशयित कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

449
फोटो- प्रातिनिधीक

कोल्हापुर येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात कोरोना कक्षात हातकणंगले येथील एका 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचे सोमवारी सकाळी समोर आले आहे. त्या रुग्णाला उपचारासाठी संशयित म्हणून कोरोना कक्षात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान मधुमेहाने आजारी असलेल्या या वृद्धाला रविवारी उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना न्युमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांची कोणतीही ट्रॅव्हल वा कोरोनो संसर्ग झालेल्या व्यक्तिशी संपर्काची कसलीही पार्श्वभूमी नाही. तरीसुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचा स्वॅब नमुना तपासणीसाठी पाठविला असून अद्याप त्याचा अहवाल अप्राप्त आहे. मधुमेह आणि न्युमोनियाने गंभीर असणाऱ्या या रुग्णावर उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी साडे आठ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पी पाटील यांनी सांगितले.

चार दिवसांपूर्वी पुणे येथुन भक्तीपुजा नगर, मंगळवार येथे नातेवाईकांच्या घरी आलेल्या तरुणाला कोरोना झाल्याचा अहवाल आला. पाठोपाठ काल त्याच्या कुटुंबातील महिला सदस्यालाही लागण झाल्याचा अहवाल आला होता. तर आज सकाळी एका वृद्धाचा छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात करोना कक्षात मृत्यू झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली. अहवाल आल्यानंतरच कोरोनाचे चित्र स्पष्ट होणार असल्याने, प्रशासनासह कोल्हापूरकरांची धाकधुक आता पुन्हा वाढली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या