
फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणावरून गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून शनिवारी रात्री नूर काले समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोरच शिवसेना उपतालुकाप्रमुख युवराज घोरपडे यांच्यावर डिझेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी 22 जणांवर गुन्हा दाखल केला असून, नऊजणांना अटक केली असून, त्यांना 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणावरून गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून शनिवारी रात्री नूर काले समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोरच शिवसेना उपतालुकाप्रमुख युवराज घोरपडे यांच्यावर डिझेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर संतप्त शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता.
अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी नूर काले याच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिक शांत झाले होते. रविवारी जिल्हा पोलीस शैलेश बलकवडे यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात उपस्थित राहून घटनेची माहिती घेतली. यानंतर आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मंगल चव्हाण, शहरप्रमुख वैशाली जुगळे यांनी जिल्हा पोलीसप्रमुखांची भेट घेऊन आरोपीला कडक शासन करून अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी केली.

































































