कोल्हापुरात 665 पैकी 425 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

554

कोल्हापूर जिल्ह्यात रविवारअखेर 765 रूग्णांपैकी 425 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत 79 प्राप्त अहवालापैकी 4 पॉझिटिव्ह तर 72 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.यातील 3 पॉझिटिव्ह अहवाल पुन्हा आढळून आला आहे. सध्या आजअखेर जिल्ह्यात एकूण 232 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 4 पॉझिटिव्ह अहवाल हे आजरा तालुक्यातील आहेत. त्यामुळे आजअखेर आजरा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 69 वर गेली आहे. तर भुदरगड- 67, चंदगड- 75, गडहिंग्लज- 69, गगनबावडा-6, हातकणंगले-6, कागल-55, करवीर-14, पन्हाळा-25, राधानगरी-63, शाहूवाडी-169, शिरोळ-7, नगरपरिषद क्षेत्रात-11, कोल्हापूर महापालिका क्षेत्रात-21 असे एकूण 665 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे.तर आतापर्यंत एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या