
रात्री आठ पर्यंत जिल्ह्यात आणखी 2 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 736 झाली. आज आणखी 7 जणांना डिस्जार्ज देण्यात आल्याने आतापर्यंत एकूण 683 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात 8 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला. सध्या 45 कोरोना बाधीतांवर सीपीआर येथे कोरोना कक्षात उपचार सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू असल्याची समाधानकारक चित्र दिसून येत आहे.
दरम्यान आज रात्री 8 वाजेपर्यत प्राप्त अहवाला पैकी 2 कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण हे गडहिंग्लज तालुक्यात आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंत गडहिंग्लज तालुक्यात एकुण 88 तर शाहुवाडी तालुक्यात सर्वाधिक 180 कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन मिळाली.





























































