
एका अल्पवयीन मुलीद्वारे शहरातील एका कापड व्यापाऱयाला ‘हनी ट्रप’मध्ये अडकवून सुमारे अडीच लाख रुपये उकळणाऱया सहाजणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या 15 दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. शनिवारी रात्री संबंधित व्यापाऱयाने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आज सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांकडून पोलिसांनी जांबियासह मोबाईल, दुचाकी असा सुमारे 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी टोळीचा सूत्रधार सागर पांडुरंग माने (32) याच्यासह सोहेल उर्फ अरबाज मुनाफ वाटगी (23), उमेश श्रीमंत साळुंखे (23), आकाश मारुती माळी (30), लुकमान शकील सोलापुरे (27) आणि सौरव गणेश चांदणे (23) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
शहरातील एका कापड व्यापाऱयाला 15 दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवर मैत्री करण्याचा बहाणा करून संबंधित अल्पवयीन मुलगी भेटण्यासाठी त्याच्या फ्लॅटवर गेली होती. त्यानंतर काही वेळातच तेथे आलेल्या सागर माने व इतर साथीदारांनी त्या व्यापाऱयाला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्याला मारहाण करून त्याच्या गाडीतील दीड लाख रुपये घेऊन त्याच्याकडील तीन कोरे चेक सह्या करून घेतले. बागल चौकातील एका सोनेतारण करणाऱया फायनान्सच्या कार्यालयात नेले. त्याच्या अंगावरील दागिने गहाण ठेवून 1 लाख रुपये घेतले. त्यानंतर वारंवार पह्न करून पह्टो मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन दहा हजारांची मागणी करत होते.






























































