
कोल्हापूर-नवी मुंबई दिवसातून दोन वेळा इंडिगो एअरलाइन्सची विमान सेवा आजपासून सुरू झाली आहे. नव्या सेवेच्या विमानातून 67 प्रवाशी कोल्हापुरात आले. तर मुंबईला 65 प्रवाशी रवाना झाले. इंडिगो एअरलाइन्सचे हे विमान रोज सकाळी 8 वाजता नवी मुंबई विमानतळावरून टेकऑफ घेईल.तर 9 वाजून 15 मिनिटांनी कोल्हापुरात येईल. 15 मिनिटाच्या विश्रांतीनंतर 9 वाजून 35 मिनिटांनी विमान नवी मुंबईच्या दिशेने टेकऑफ घेऊन 10 वाजून 25 मिनिटांनी नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे.
सायंकाळच्या सत्रात 7 वाजून 20 मिनिटांनी नवी मुंबई विमानतळावरून टेकऑफ घेऊन रात्री 8 वाजून 30 वा. कोल्हापूर विमानतळावर लँडिंग होईल. येथेही 20 मिनिटांच्या विश्रांतीनंतर 8 वाजून 50 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून टेकऑफ घेऊन रात्री 10 वाजून 35 मिनिटांनी नवी मुंबईत पोहोचेल.


























































