कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला; नद्यांच्या पाणीपातळीत घट

335

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा ओसरला असून नद्यांच्या पाणीपातळीही संथ गतीने घट होऊ लागली आहे. तयामुळे संभाव्य पुराच धोका टळला आहे. गेल्या पाच सहा दिवापासून पावसाचा जोर वाढल्याने नद्यांनी धोक्याची पातळी गाठली होती. राधानगरीचे सुरू असलेले 4 आणि 5 क्रमांकाचे दोन्ही स्वयंचलित दरवाजे रविवारी सकाळी बंद झाल्याने केवळ विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू होता. पंचगंगा नदी अजूनही 43 फूटांच्या धोक्याच्या पातळीवर असून दोन दिवसांत दिड फुट पाणीपातळी कमी झाली आहे. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पंचगंगेची पातळी 43 फूट 6 इंच इतकी होती. तर 67 बंधारे पाण्याखाली होते.

गगनबावडा तालुक्यात 65 मिमी पाऊस
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 65 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.तर हातकणंगले 3.88,शिरोळ 0.71 , पन्हाळा 16.14, शाहूवाडी 17.33, राधानगरी 15.83, करवीर 9.27, कागल 6.29, गडहिंग्लज 5, भुदरगड 13.20, आजरा 18.25 आणि चंदगड तालुक्यात 10.83 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

अलमट्टीतून 1 लाख 80 हजार क्युसेक विसर्ग
राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजापैकी क्रमांक 4 चा दरवाजा रविवारी सकाळी 8.30 तर क्रमांक 5 चा दरवाजा सकाळी 9.30 वाजता बंद झाला आहे. धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू होता. तर अलमट्टी धरणातून 40 हजार क्युसेक विसर्ग कमी करण्यात आला असून सध्या 1 लाख 80 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या नोंदीनुसार कोयना धरणात 73.04 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 92.428 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. राधानगरी (98),तुळशी (80),वारणा (86),दुधगंगा (85),कासारी (88),कडवी (85), कुंभी (83),पाटगाव (91),चिकोत्रा (66),चित्री (89) टक्के अशी धरणे भरली आहेत. तर जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे आणि कोदे लपा हे मध्यम व लघु प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या