कोल्हापूर – कृषी विधेयकाविरोधात शिवसेनेचा बैलगाडीवरून मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषि विधेयकाविरोधात आज जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढुन तीव्र निदर्शने करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकताच, केंद्र सरकारच्या या कृषि विधेयकाविरोधात घोषणाबाजी करुन,तीव्र निदर्शने करण्यात आली. या देशातील शेतकरी जगला पाहिजे यासाठी शिष्टमंडळाकडुन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये केंद्र सरकारने आणलेले हे नवीन शेती विधेयक त्वरीत रद्द करावे, शेतकऱ्यांना वीज व पाणी मोफत मिळावे, शेतीसाठी लागणारे बी-बियाणे व खतांना शंभर टक्के सबसीडी मिळावी, शेतीपंपाचे वीज कनेक्शन त्वरीत मिळावे, शेतीला अखंड 24 तास वीज पुरवठा झाला पाहिजे, शेतकरी व शेतमजूरांना पेन्शन मिळावी, शेती अवजारांना राष्ट्रीयकृत, शेडयुल, सहकारी बँकातून खरेदीसाठी शुन्य टक्के व्याजाने शंभर टक्के कर्जपुरवठा केला पाहिजे आदी मागण्यांचा समावेश आहे.

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.यावेळी सुजीत चहाण,संभाजी भोकरे, अवधुत साळोखे, राजु यादव,प्रकाश पाटील,शिवाजी पाटील, शिवाजी जाधव,विराज पाटील,शुभांगी पोवार, शैलजा पाटील,दत्ता टिपूगडे,मंजित माने आदी शिवसैनिक उपस्थित होते