कोल्हापूरहून पाचवी श्रमिक विशेष रेल्वे 1 हजार 456 मजुरांसह उत्तरप्रदेशकडे रवाना

360

उत्तरप्रदेशकडे 1 हजार 456 मजूर आज श्रमिक विशेष रेल्वेने दुपारी एक वाजता कोल्हापुरातून रवाना झाले. भारत माता की जय ! छत्रपती शाहू महाराज की जय! चा नारा देत या मजुरांना कोल्हापूरकरांनी शुभेच्छा दिल्या.

उत्तरप्रदेश शासनाकडून मंजुरी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने करवीर (ग्रामीण) मधील 1 हजार 276,महानगरपालिका क्षेत्रातील-114, हातकणंगले-60 आणि कागल तालुक्यातील 6 अशा 1 हजार 456 मजुरांची यादी करुन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उत्तरप्रदेशकडे जाणाऱ्या रेल्वेचे नियोजन केले.छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथुन २४ बोगीतुन हे सर्व मजुर रवाना झाले.तहसिलदार शीतल मुळे-भामरे,डॉ. डी.वाय.पाटील पॉलिटेक्नीकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके,नगरसेवक तौफिक मुल्लांनी,स्टेशन प्रबंधक ए.आय.फर्नाडिस आदी उपस्थित होते.

रेल्वेच्या तिकीटांचा खर्च हा मुख्यमंत्री निधीतून
आतापर्यंत 5 श्रमिक विशेष रेल्वे मध्यप्रदेश,उत्तर प्रदेश,बिहार,राजस्थान राज्यात रवाना झाल्या आहेत. यामधुन 6 हजार 759 परप्रांतीय मजुर, कामगार,पर्यटक विद्यार्थी आपापल्या राज्यात रवाना झाले आहेत. या सर्वांच्या रेल्वेच्या तिकीटांचा खर्च हा मुख्यमंत्री निधीतून करण्यात आला आहे.तसेच त्यांना दोन दिवस पुरेल अशा जेवण,नाश्ता,पाणी बाटली तसेच मास्क या सर्वांची सुविधा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या