जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचे बेमुदत धरणे आंदोलन

260

राज्यातील आदिवासी महादेव कोळी व तत्सम जमातीला शासनाच्या महसूल व आदिवासी विभागाकडून जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने द्यावे, मराठवाडय़ातील एसआयटी रद्द करावी अशा विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी क्रांती सेनेच्या वतीने आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले.

महादेव कोळी व तत्सम जमातीला न्याय द्यावा अन्यथा समाजबांधव उग्र आंदोलन करतील असा इशारा या वेळी संघटनेने दिला. या आंदोलनाला शानाभाऊ सोनावणे, सिद्धेश्वर कोळी , रामकुमार निशाद, पंढरीनाथ कोणे, सतीश धडे, शिवशंकर फुले, माधव पिटले, चंद्रहास नरमले, हनुमंत मामिलवाड, डी. एम. कोळी, मोहन कडू, मदन भोई, भालचंद्र कोळी, समीर सागर, जयवंती कोळी, धीरज बुंदे, शंकर तमणबोईन वाड, अतुल कोळी, प्रल्हाद कदम उपस्थित होते. या आंदोलनाला महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी पाठिंबा दिला.

आपली प्रतिक्रिया द्या