कोळीबांधव आर्थिक विवंचनेत, नारळीपौर्णिमेच्या दोन आठवडे आधीच मासेमारीला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
(छाया - सचिन वैद्य)

कोरोनामुळे मच्छिमार बांधकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाळ्यात बंद झालेली मासेमारी नारळी पौर्णिमेला दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करून पुन्हा सुरू होते. परंतु तोपर्यंत थांबलो तर जगायचे कसे? असा प्रश्न मच्छिमारांना पडला आहे. त्यामुळे पौर्णिमेपूर्वी दोन आठवडे आधीच मच्छिमारांनी बुधवारी श्रीफळ वाढवून आपल्या होड्या समुद्रात सोडल्या.