कोलकाता स्फोटतील आरोपींना केले गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोलकाता येथील शिबपूर येथे गोळीबार आणि स्फोटनंतर पळून गेलेल्या आरोपीच्या गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने मुसक्या आवळल्या. शमीम अहमद अब्दुल रशीद, जमील अख्तर अली आणि आफताब अन्वर खुर्शीद अन्वर अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांना पुढील कारवाईसाठी शिबपूर पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे.

7 मे रोजी शिबपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 100-150 जणांच्या असामाजिक तत्त्वांच्या गटाने हल्ला केला. हल्ल्यादरम्यान त्याने बॉम्ब फेकले. तसेच अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबार आणि स्फोटत काही जण जखमी झाले. घडल्याप्रकरणी शिबपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्या गुह्यात फरार असलेले आरोपी मुंबईत लपले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 6 ला मिळाली होती.