IPL 2026 – केकेआरचं टेन्शन वाढलं; हर्षित राणानंतर डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज जखमी, संपूर्ण स्पर्धेला मुकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीगचा नवीन हंगाम सुरू होण्यास अवघए 7 दिवस बाकी आहेत. 28 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद संघात सलामीची लढत खेळली जाणार आहे, तर तीन वेळचा विजेता कोलकाता नाईट रायडर्स मुंबईतील वानखेडे मैदानावर 29 मार्चला पहिला सामना खेळेल. मात्र या स्पर्धेला सुरुवात होण्याआधी कोलकाताच्या अडचणीत वाढ झाली आहे. संघाचा प्रमुख हिंदुस्थानी गोलंदाज आकाश दीप जायबंदी झाला असून डॉक्टरांनी त्याला 8 ते 12 आठवड्यांची विश्रांती सांगितली आहे. त्यामुळे तो आयपीएलला मुकणार आहे. एवढेच नाही तर जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यालाही मुकण्याची शक्यता आहे. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

बीसीसीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश दीपला कंबरेच्या दुखापतीचा पुन्हा त्रास जाणवू लागला आहे. ही दुखापत पूर्णपणे बरी होण्यासाठी साधारण 3 महिने लागू शकतात. फेब्रुवारी महिन्यात बंगालकडून रणजी ट्रॉफीचा उपांत्य सामना खेळताना या दुखापतीने उचल खाल्ली होती. सध्या तो उपचारांसाठी बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जाणार आहे.

दरम्यान, आयपीएलचा शुभारंभ होण्याआधी केकेआरला बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. याआधी अष्टपैलू खेळाडू हर्षित राणा गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर फेकला गेला होता. तसेच श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज पथिराना हा देखील खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे पूर्ण फिट नाही. त्यामुळे तो सुरुवातीच्या काही लढतींना मुकण्याची शक्यता आहे.

तीन प्रमुख गोलंदाजांना झालेल्या या दुखापतींमुळे केकेआरच्या वेगाचा ताफा कमकुवत झाल्याचे दिसते. सध्या केकेआरकडे वैभव अरोरा, उमरान मलिक, ब्लेसिंग मुजरबानी आणि कार्तिक त्यागी हे वेगवान गोलंदाजांची फळी आहे. तर कॅमेरून ग्रीन आणि रमणदीप सिंग हे अष्टपैलू खेळाडू आहेत.

तेव्हा माझ्या घरी 2 मुली होत्या… माईक ऑन राहिला अन् गुपित फुटलं; KKR चा मेंटर ड्वेन ब्रावोच्या विधानामुळे मोठा राडा

कुणाला संधी मिळणार?

आकाश दीप आणि हर्षित राणा यांच्या जागी नवीन खेळाडू निवडण्यासाठी केकेआरने ईडन गार्डन्सवर चाचणी सुरू केली आहे. यामध्ये नवदीप सैनी, आकाश मधवाल, सिमरजीत सिंग, संदीप वॉरियर, के.एम. आसिफ आणि सुनील कुमार यांसारख्या गोलंदाजांचा विचार केला जात आहे.

IPL 2026 – 55 चेंडूंमध्येच खुर्दा उडवला; सामना हातातून निसटलेलाच… पण 21 वर्षाच्या पोरानं चित्र बदललं