रत्नागिरीत तरुणावर चाकूने हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। रत्नागिरी

रिक्षाच्या ऑईलमध्ये पाणी ओतल्याचा राग आल्याने एका तरूणाने दुसर्‍ या तरूणाच्या पोटात चाकू खुपसून हल्ला केल्याची घटना रत्नागिरी शहरातील बंदररोड येथे घडली़

आदित्य चंद्रेखर चव्हाण (20) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे़. तर अमोल आत्माराम झगडे (36) असे आरोपीचे नाव आहे. आदित्य व अमोल यांच्यात बंदररोड येथे वाद झाला़ होता.रिक्षाच्या ऑईल मध्ये पाणी ओतल्याचा गैरसमज करत अमोलने आदित्यला घराबाहेर बोलावून घेतले. नंतर ठार मारेन अशी धमकी देताना सुरूवातीला चाकू आदित्यच्या पोटात खूपसला आदित्यने प्रतिकार करताच अमोलने आदित्यच्या हातावर चाकूने वार केला. रत्नागिरी पोलीस ठाण्यामध्ये आदित्यने त्याच्यावर झालेल्या हल्ल्याची फिर्याद दाखल केली आहे. शहर पोलीसांनी अमोल झगडेला अटक केली आहे.