आडीवरेत विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी। रत्नागिरी

राजापूर तालुक्यातील आडिवरे नवेदरवाडीतील घरात विजेचा धक्का बसून मंदार मनोहर शिंदे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यु झाला. रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मंदार शिंदे (25) घरातील आतल्या खोलीत पाणी पिण्यासाठी गेला होता. खोलीत अंधार असल्याने त्याने लाईट लावला . त्याचक्षणी त्याला विजेचा मोठा धक्का बसला. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

नातेवाईकांनी नाटे पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच नाटे पोलिस स्थनकाच्या पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, पोलीस कर्मचारी कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला होता.मंदारच्या मृत्यूचे वृत्त आडिवरे पंचक्रोशी पसरतात येथील ग्रामस्थांनी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली .रात्री उशिरा मंदारच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या मृत्यूची नोंद नाटे पोलीसांनी केली आहे.