
सामना ऑनलाईन । कुडाळ
गेल्या महिनाभरात पावसाने कोकण किनारपट्टीला अक्षरश: धुवून काढले आहे. त्यामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता रेल्वे रुळांवर पाणी आल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.
सिंधुदुर्गमधील झाराप आणि कुडाळ स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने ह्या भागातील वाहतूक थांबवण्यात आली आहे. पाणी ओसरल्यानंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल.




























































