ब्रिटीशकालीन आंबेरी पूल पाण्याखाली; 25 गावांचा संपर्क तुटला

391

कुडाळ तालुक्यातील माणगाव परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने तेथील नर्मला नदीला पूर येऊन आंबेरी येथील ब्रिटिशकालीन पुलावर पाणी आल्याने माणगाव परिसरातील सुमारे 25 गावांचा माणगावशी संपर्क तुटला आहे. मंगळवार सायंकाळपासून बुधवारी दुपारपर्यंत या पूलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहतूक खोळंबली. या पूलावर पाणी आल्याने शिवापूर, उपवडे, दुकानवाड, आंजिवडे, वसोली आदी 25 गावांचा माणगाव बाजारपेठेशी संपर्क तुटला. या भागात जोरदार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळित झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या