
सामना प्रतिनिधी। रत्नागिरी
गल्लीपासून दिल्ली पर्यंत हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यात फक्त ‘नमो’ नामाचा सुर असलेला जयजयकार सातासमुद्रापार पोहचला आहे. न्यूजर्सीत कमळाची जर्सी पहाण्याचा अनुभव न्यू जर्सीत अन्यन्या नाटकाच्या प्रयोगासाठी गेलेल्या मराठमोळ्या कलाकारांनी घेतला.
अनन्या नाटकात महत्वाची भूमिका करणारे अभिनेते प्रमोद पवार यांनी परदेशातील हिंदुस्थानींच मोदीप्रेम आपल्या कॅमेरात टिपलं आहे. महाराष्ट्रात गाजलेल्या अनन्या या नाटकाचे प्रयोग न्यूजर्सीत होत आहेत.महाराष्ट्रातील व्यवसायिक रंगमंचावर डंका पिटून अनन्या नाटक न्यूजर्सीत पोहचले तेव्हा त्यांना जगाच्या रंगभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डंका असल्याचा अनुभव अनन्या नाटकातील कलाकारांना आला.
न्यूजर्सीतील एका हिंदुस्थानीच्या दुकानात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण केले. परदेशात असूनही तो भाजपच्या विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला होता.त्याने भगव्या रंगाची टोपी,भगव्या रंगाचा टि-शर्ट,भगव्या रंगाची शाल परिधान केली होती.त्या भगव्या रंगाच्या टी-शर्टवर कमळ आणि “मै भी चौकीदार हूं।” असे लिहिले होते.

































































