कोंकणा करणार वेबसीरिजचे दिग्दर्शन

236

अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा ही कोलकात्यातील कॅब्रेवर वेबसीरिज काढणार आहे. कोलकात्यातील 60 आणि 70च्या दशकातील कॅब्रे क्वीन शेफाली हिच्यावर ही सीरिज असेल. झी स्टुडिओची निर्मिती असलेल्या या सीरिजसाठी कलाकारांची निवड सुरू झाली आहे. ‘स्वातंत्र्यानंतरचा आणि देशात आधुनिकतेचे वारे वाहण्याचा काळ म्हणजे बदलांचा काळ. हा काळ मला भुरळ घालतो. त्यात मी कोलकात्यातच जन्मले आणि मोठी झाले. त्यामुळे या शहराबद्दल मला वेगळे ममत्व आहे. म्हणूनच कथा आवडल्यावर मी त्याचे दिग्दर्शन करण्याचे नक्की केले’ असे कोंकणा म्हणाली. कोंकणाने पहिल्यांदा 2017 मध्ये ‘ए डेथ इन द गुंज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.

आपली प्रतिक्रिया द्या