कोपरगाव ऊस हार्वेस्टिंग मशीनच्या चाकाखाली चिरडल्याने एक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

कोपरगाव तालुक्यातील भोजडे शिवारातील स्वतःच्या शेतात ऊस तोडणीसाठी गेलेल्या इसमाचा ऊस हार्वेस्टिंग मशीनच्या चाकाखाली चिरडल्याने मृत्यू झाला. राधाकृष्ण निवृत्ती सिनगर (49) असे त्यांचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास घडली.

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना यांच्या ऊस हार्वेस्टिंग मशीन मार्फत सिनगर यांच्या शेतातील ऊस तोडणी सुरू होती, सिनगर हे त्या ठिकाणी शेतात उभे राहून लक्ष ठेवत होते. अचानक पाचटावरून पाय घसरून पडल्यानंतर हार्वेस्टिंगच्या मागील चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचे कळते कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला सायंकाळी उशिरा भोजडे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरा कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.