कोपरगाव पालिका कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संपावर; काळ्या फिती लावून इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुन्या पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचारी यांनी सोमवारी काळ्या फिती लावून इशारा दिला आहे. कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा देत उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांना निवेदन देण्यात आले.

राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, राज्य संवर्ग कर्मचारी, स्थानिक नगरपरिषद कर्मचारी व रोजंदारी कर्मचारी यांच्या विविध मागण्यांबाबत वेळोवेळी नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांना निवेदन दिले आहेत. तसेच नगरविकास मंत्री यांच्यासोबत बैठक होवूनही अद्याप नगरपरिषद, नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी यांच्या सोबत जोडलेल्या मागण्या प्रलंबित आहेत. तरी संबंधित मागण्या संदर्भात सर्व संघटना मार्फत वेळोवेळी निवेदन सादर करून विनंती करूनही शासनाने अद्याप मागण्यांबाबत कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही.

सर्व संघटनांनी एकत्रित येवून महाराष्ट्र राज्य नगरपालिका महासंघ तयार केलेला आहे. मागण्यांवर कोणताही निर्णय होत नसल्याने नाईलाजास्तव सोमवारी (दि.13 मार्च) काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला तर मंगळवारी (दि.14 मार्चपासून) कोपरगाव नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी बेमूदत संपावर जात असल्याचे निवेदन सोमवारी कोपरगाव नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचारी यांनी नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांना देण्यात आले.