कोपरगावात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
एका 22 वर्षीय तरुणाने राहत्या घरी  स्वयंपाक खोलीच्या छतास धोतराच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील पढेगाव  भागात घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अहिंद्रेस छंदू काळे (22) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी ही घटना घडली आहे. मृत तरुणाचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते तो आपल्या आई-वडील व पत्नीसह पढेगाव शिवारात पंचेचाळीस चारीस राहत होता. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मृताची पत्नी दीपाली काळे हिने प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली होती. खबर मिळताच  ग्रामीण पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळाचे भेट दिली. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद  दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक काळे हे करत आहेत.