कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा: कश्यप पराभूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
New Delhi: Parupalli Kashyap of Chennai Smashers plays against W Ki Vincent Wong of Awadhe Warriors during the Premier Badminton League II, 2017, Stage 2-Team Knock out (men's singles) match at Sirifort Sports complex in New Delhi on Friday. Kashyap won the match by 11-4,11-6. PTI Photo by Vijay Verma (PTI1_13_2017_000241B)

हिंदुस्थानचा झुंजार बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपचे कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान शनिवारी संपुष्टात आले. दोन वेळच्या चॅम्पियन जपानच्या केंटो मोमोटाने कश्यपचा 21-13, 21-15 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली.

अव्वल मानांकित जपानी प्रतिस्पर्ध्याने 30व्या मानांकित कश्यपचा 40 मिनिटांत पराभव केला. 33 वर्षीय अनुभवी कश्यप या सत्रात दुसऱयांदा उपांत्य लढतीत पराभूत झाला. याआधी इंडिया ओपन सुपर स्पर्धेतही त्याने अंतिम चारपर्यंतचा प्रवास केला होता. कश्यप व मोमोटा यांच्यात आतापर्यंत झालेल्या तीनही लढतींत मोमोटानेच बाजी मारली. वर्ल्ड चॅम्पियन पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांना या स्पर्धेत सलामीलाच गाशा गुंडाळावा लागला, तर बी. साई प्रणीतलाही दुखापतीमुळे अर्ध्यातून लढत सोडावी लागली. आता कश्यपच्या पराभवामुळे हिंदुस्थानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.