
राजस्थानच्या कोटामध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. दहावीच्या विद्यार्थीनीने रिल बघू न दिल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कोटा येथील बोरखेडा परिसरात घडली आहे.
कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बजरंग नगर येथे राहणारी कृपांगी (14) शिकत होती. कृपांगीला मागच्या काही महिन्यांपासून सतत मोबाईलवर खेळ आणि रिल बघण्याची सवय लागली होती. शनिवारी सायंकाळी कृपांगीचे वड़िल घरी काम करत होते. त्याचवेळी त्यांना मोबाईलची गरज पडली. शोधत असताना कळले फोन मुलीकडे आहे. त्यांनी तिच्याकडे फोन मागितला त्यावेळी ती फोन द्यायला चिडचिड करायला लागली. ती मोबाईलवर रिल बघत होती.
रिल बघत असल्यामुळे ती वडिलांकडे फोन द्यायला तयार नव्हती. अखेर वडिल तिच्यावर ओरडले त्यामुळे फोन बाजूला टाकून ती निघून गेली आणि खोलीत गेली. घरच्यांना वाटले ती नाराज झाली म्हणून गेली,पण जेव्हा तिला रात्री जेवण देण्यासाठी दरवाजा ठोकला तर तिने काहीच आवाज दिला नाही. अखेर दरवाजा तोडला त्यावेळी मुलीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. पोलिसांना तत्काळ कळवत मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंतच तिचा मृत्यू झाला होता. आज शवविच्छेदन झाल्यानंतर तिचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल.

























































