कोयना धरणक्षेत्रात भूकंपाचे धक्के

पाटण तालुक्यातील कोयना धरणक्षेत्रात आज भूकंपाचे दोन धक्के जाणवले. दुपारी 3 वाजून 21 मिनिटांनी पहिला धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 3.00 रिश्टर स्केल एवढी होती. त्यानंतर 3.33 वाजता दुसऱयांदा भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल एवढी होती.

या भूकंपाचा केंद्रबिंदू धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या वारणा खोऱयातील चिखली या गावाच्या सात किलोमीटर अंतरावर पूर्वेला होता. पहिल्या भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली 16 किलोमीटर, तर दुसऱया भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली 15 किलोमीटर अंतरावर नोंदविली गेली. त्यामुळे या भूकंपाचे धक्के कोयना धरण परिसरातील गावांनाही बसले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या