
कोयना परिसरासह कोकण किनारपट्टीला रविवारी सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या धक्क्याची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल इतकी होती. कोयना व पाटण परिसरात भूकंपाचा धक्का ठळकपणे जाणवल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोयना, पाटण, संगमेश्वर, रत्नागिरी परिसर या धक्क्याने हादरला. कोयना परिसरात भूकंपाच्या धक्क्याची कंपने 2 सेकंद जाणवली. भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱयात तनाली गावाच्या पश्चिमेला 12 किलोमीटर अंतरावर होता. केंद्रबिंदूची खोली 11.37 किलोमीटर इतकी होती. दरम्यान, या भूकंपामुळे कोठेही जीवित वा वित्तहानी नाही; तसेच कोयना धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचे धरण व्यवस्थापनाने सांगितले.
देवरुख, संगमेश्वरात भूकंपाचे हादरे
संगमेश्वर ः भूपंपाची नेमकी जागा माहीत नसली तरी संध्याकाळी 5 वाजून 9 मिनिटांनी संगमेश्वर आणि देवरुख परिसरात भूपंपाचे धक्के जाणवले. 4 ः 46 स्केलचा भूपंप होता. त्याचं पेंद्र हे पाच किलोमीटरच्या परिसरात असण्याची शक्यता वर्तविण्यात आली. आज दिवसभर वातावरण ढगाळ असल्याने सायंकाळी बसलेल्या भूपंपाच्या धक्क्यांनंतर जाणकारांनी अशा वातावरणानंतर भूपंपाचे धक्के जाणवतात, असे मत व्यक्त केले. दरम्यान, आजच्या भूपंपाने कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.

































































