
केरळमध्ये कोझिकोडच्या बेपोर परिसरातील एका नारळ तेलाच्या गिरणीत रविवारी आग लागल्याची घटना घडली. ही घटना रविवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास लागली.
रेणुका ऑइल मिलमध्ये ही दुर्घटना घडली असून प्राथमिक माहितीनुसार, नारळ तेल उत्पादन होणाऱ्या विभागात ही आग पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन आणि बचाव दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भीषण आगीत गिरणीतील प्रमुख यंत्रसामग्री पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने, रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे आग लागली तेव्हा कारखान्यात एकही कामगार उपस्थित नव्हता, त्यामुळे कोणतीही जीवितहानी टळली आहे. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.























































