बलात्कार होणारच असेल तर झोपा आणि मजा घ्या! काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर बलात्कार होणारच असेल तर त्याची मजा घ्या, असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस नेत्याने केलं आहे. गंभीर म्हणजे हे वक्तव्य या नेत्याने विधानसभेत केलं आहे. या विधानानंतर नेत्यावर टीकेची झोड उठली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे वक्तव्य कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार केआर. रमेश कुमार यांनी गुरुवारी विधानसभेत केलं. गुरुवारी कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनात पाऊस आणि पुराने झालेल्या नुकसानावर चर्चा होत होती.

या चर्चेत अनेक आमदार आपापल्या भागात झालेल्या नुकसानाची मांडणी करण्यासाठी उत्सुक होते. मात्र, विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्याकडे वेळ कमी असल्याने त्यांना कामकाज लवकर आटोपतं घ्यायचं होतं. तर, आमदार वेळ वाढवून मागत होते.

या दरम्यान, कागेरी म्हणाले की, मी अशा परिस्थितीत आहे जिथे मला फक्त हो ला हो करून मजा घ्यायची आहे. मला तरी असंच वाटतंय की मी परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न थांबवून कामकाज व्यवस्थित सुरू ठेवलं पाहिजे, असं म्हणत कागेरी यांनी सभेचं कामकाज पुढे सरकत नसल्याचं सांगितलं.

त्यावर रमेश कुमार म्हणाले की, अशी म्हण आहे की जेव्हा बलात्कार होणारच असेल तेव्हा झोपा आणि मजा घ्या. तुम्ही सध्या याच परिस्थितीत आहात, असं कुमार म्हणाले. पण, या विधानावर आक्षेप घेण्याऐवजी कागेरी हसले.

अशा प्रकारची वक्तव्यं करण्याची कुमार यांची ही पहिली वेळ नाही. 2019मध्ये विधनासभा अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी स्वतःच्या परिस्थितीवर भाष्य करताना देखील माझी परिस्थिती बलात्कार पीडितेसारखी झाल्याचं म्हटलं होतं.