14 तारखेपर्यंत कृपाशंकर वेटिंगवर

703

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला जोरदार धक्का दिला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा देणारे कृपाशंकर हे लगेचच बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती, मात्र मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमधून आलेल्या हर्षवर्धन पाटील यांचाच केवळ भाजपमध्ये प्रवेश झाला. कृपाशंकर सिंह हे 14 सप्टेंबरपर्यंत वेटिंगवर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

कृपाशंकर सिंह यांच्या घरी गणपतीला गेली दोन वर्षे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून हजेरी लावत होते. 370 कलम हटविण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत त्यांनी केले होते. त्यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. बुधवारी मुंबईत झालेल्या भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमापासून त्यांनी दूरच राहणे पसंत केले. हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश होत असताना कृपाशंकर हे दिवसभर आपल्या कार्यालयात बसून होते.

आपली प्रतिक्रिया द्या