
सामना प्रतिनिधी। कुडाळ
कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19 अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यातील वीज संदर्भात 92 कामे मंजूर कऱण्यात आली आहे. यासाठी 2 कोटी 88 लाख 58 हजार निधी मंजूर करण्यात आला असून या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर, एचटी , एलटी लाईन कन्व्हर्जन, लाईन शिफ्टिंग, पोल बदलणे, स्ट्रीट लाईट बसविणे, आदी कामे करण्यात येणार आहेत. यामुळे कुडाळ मालवण तालुक्यातील विजेची समस्या दूर होणार असून लवकरच या कामांना सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19 अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यात मंजूर झालेली वीज संबंधित कामे पुढीलप्रमाणे – पिंगुळी गोंधीयाळे येथे ट्रान्सफॉर्मर बसविणे 10.17 लाख, कवठी गावकरवाडी येथे ट्रान्सफॉर्मर बसविणे 10.67 लाख, कुडाळ बौद्धवाडी भोरभाटवाडी वरचीवाडी येथे ट्रान्सफॉर्मर बसविणे 10.92 लाख, आंबडपाल भद्रकाली मंदिर येथे ट्रान्सफॉर्मर बसविणे 14.44 लाख, वाघोसेवाडी येथे ट्रान्सफॉर्मर बसविणे 03.08 लाख, कुडाळ कांधारेवाडी येथे ट्रान्सफॉर्मर बसविणे 03.08 लाख, कुडाळ कानिरनेवाडी एल टी लाईन 2.38 लाख, आंदुर्ले बाजारपेठ एच टी, एलटी पोल बदलणे 6.33 लाख, तेर्से बांबर्डे एलटी पोल बदलणे 1.45 लाख, कुडाळ मरलवाडी परबवाडी एचटी पोल बदलणे 3.66 लाख, ओरोस मधलीवाडी ब्राम्हणवाडी एलटी पोल बदलणे 96 हजार, ओरोस सहदेव परब घराजवळ एचटी लाईन स्थानांतरित करणे 3.63 लाख,
कुडाळ श्रीराम वाडी गणेशताड एलटी लाईन स्थानांतरित करणे 5.19 लाख, कुडाळ श्रीरामवाडी एलटी लाईन स्थानांतरित करणे 29 हजार, कुडाळ रॉनी डान्टस घराजवळ एलटी लाईन स्थानांतरित करणे 46 हजार, कुडाळ सुंदर म्हापणकर यांच्या घराजवळ एलटी लाईन 34 हजार, पडवे एलटी लाईन स्थानांतरित करणे 4.22 लाख, ओरोस श्रीकृष्ण मंदिर एलटी लाईन स्थानांतरित करणे 1.66 लाख, कडावल महापुरुष मंदिर एलटी लाईन स्थानांतरित करणे 50 हजार, ओरोस रमेश पवार घराजवळ एलटी लाईन स्थानांतरित करणे 97 हजार, ओरोस शिर्केवाडी विलास घाडगे यांच्या घराजवळ एलटी लाईन स्थानांतरित करणे 56 हजार, शिर्केवाडी शंकर तारापूरे यांच्या घराजवळ एलटी लाईन स्थानांतरित करणे 56 हजार , जेरोस परेरा यांच्या घराजवळ एलटी लाईन स्थानांतरित करणे 43 लाख, हुमरमळा स्ट्रीटलाईट जोडणी 1.39 लाख, केरवडे नारुर जगन्नाथ मंदिर ते देऊळवाडी स्ट्रीटलाईट जोडणी 2.47 लाख, साळगाव लुभाटवाडी ते वरची धुरीवाडी स्ट्रीटलाईट जोडणी 3.25 लाख, हळदीचे नेरूर धुरीवाडी स्ट्रीटलाईट जोडणी 2.47लाख, आंदुर्ले कापडोसवाडी ते जुवीवाडी स्ट्रीटलाईट जोडणी 4.45 लाख, पावशी मिटक्याचीवाडी स्ट्रीटलाईट जोडणी 5.21 लाख, चेंदवण नेरकर घाटी स्ट्रीटलाईट जोडणी 85 हजार, झाराप स्ट्रीटलाईट जोडणी 4.02 लाख, माणगाव दुकानवाड बाजार ते तवटेवाडी स्ट्रीटलाईट जोडणी 4 लाख, भडगाव खुर्द ब्राम्हणवाडी स्ट्रीटलाईट जोडणी 4.52 लाख, सोनवडे दुर्गनगर स्ट्रीटलाईट जोडणी 3.19 लाख , निरूखे रवळनाथ मंदिर स्ट्रीटलाईट जोडणी 3.24 लाख , ओवळीये वायंगणी वाडी येथे नवीन ट्रान्सफॉर्मर 8.04 लाख, घुमडे वस्तवाडी येथे नवीन ट्रान्सफॉर्मर 6.86 लाख , खोटले मोडकवाडी येथे नवीन ट्रान्सफॉर्मर 4.09 हजार, चव्हाणवाडी गोळवण नवीन ट्रान्सफॉर्मर 4.60 लाख ,
ओवळीये कोलेरीवाडी नवीन ट्रान्सफॉर्मर ३ लाख, माळगाव भास्करवाडी नवीन ट्रान्सफॉर्मर 8.71 लाख , मालवण गावठाणवाडी नवीन ट्रान्सफॉर्मर 10.15 लाख, पोईप हरिजनवडी नवीन ट्रान्सफॉर्मर 5.89 लाख, असरोंडी तळी धनगरवाडी नवीन ट्रान्सफॉर्मर 8.37 लाख, हिवाळे सडेवाडी नवीन ट्रान्सफॉर्मर7.62 लाख, तोंडवली सापळे बाग नवीन ट्रान्सफॉर्मर 14.48 लाख,तळगाव शेलवणेवाडी नवीन ट्रान्सफॉर्मर 13.89 लाख, तळगाव देवरवाडी नवीन ट्रान्सफॉर्मर 7.21 लाख, तळाशील गोपालकृष्ण मंदिर लाईन कन्व्हर्जन 94 हजार,आचरा गणपती मंदिर लाईन कन्व्हर्जन 2.95 लाख, गावकरवाडा मालवण लाईन कन्व्हर्जन 84 हजार, चिंदर गावडेवाडी लाईन कन्व्हर्जन 64 हजार, नरोम आचरेकरवाडी बागवेवाडी लाईन कन्व्हर्जन 95 हजार, धामापूर गोडयाचीवाडी 1.81 लाख,चाफेखोल आवटवाडी शिंदेवाडी कुणकावळे नागझरवाडी लाईन कन्व्हर्जन 3.56 लाख, चाफेखोल निकमवाडी लाईन कन्व्हर्जन 1.13 लाख.
माळगाव बौद्धवाडी लाईन कन्व्हर्जन 1.87 लाख, आचरा हिर्लेवाडी पोल बदलणे 1.56 लाख, दांडी मालवण लाईन कन्व्हर्जन 1.15 लाख, रेवतळे आदर्शनगर सर्व्हिस वायर बदलणे 1.09 लाख, तिरवडे पोल बदलणे 2.43 लाख, तिरवडे पोल बदलणे 3.29 लाख, चाफेखोल इंदूलकरवाडी पोल बदलणे 2.54 लाख,असरोंडी मळीवाडी पोल बदलणे लाईन बदलणे 2.47 लाख,मालोंड गावठाणवाडी पोल बदलणे 1.17 लाख, माळगाव साळकरवाडी पोल बदलणे 1.29 लाख,तोंडवळी सापळे बाग पोल बदलणे 5.72 लाख, बांधिवडे खुर्द पोल बदलणे 88 हजार, हिंदळे भटवाडी एलटी लाईन स्थलांतरित करणे 22 हजार, बिळवस आंगणेवाडी टर्न्सफॉर्मर स्थानांतरित करणे 1.45 लाख, दांडी मालवण फर्नांडिस घराजवळीललाईन स्थानांतरीत करणे 1.94 लाख, धामापूर थवीवाडी एलटी लाईन स्थलांतरित करणे 1.41 लाख, कुणकावळे पवारवाडी चव्हाटा एलटी लाईन स्थलांतरित करणे 67 हजार, खरारे एलटी लाईन स्थलांतरित करणे 29 हजार, मालवण भंडारी हायस्कुल एलटी लाईन स्थानांतरित करणे 48 हजार, गोठणे माळ एलटी लाईन स्थानांतरित करणे 27 हजार, कुडोपी जी प शाळा लाईन स्थानांतरित करणे 1.03 हजार, दांडी नंदकिशोर शेलटकरयांच्या घराजवळील एलटी लाईन स्थानांतरित करणे 65 हजार, निरोम बागवेवाडी स्ट्रीट लाईट जोडणी 81 हजार, नांदरुख पटेलवाडी स्ट्रीट लाईट जोडणी 1.91 हजार, हेदूळ मुख्य रस्ता ते माउली मंदिर स्ट्रीट लाईट जोडणी 1.23 लाख, कुडोपी स्ट्रीट लाईट जोडणी 1.65 लाख,मसदे विरण स्ट्रीटलाईट जोडणी 2.72 लाख, मसदे आवळदे वाडी स्ट्रीट लाईट जोडणी 1.86 हजार, वेरळ मुणगेकर वाडी स्ट्रीट लाईट जोडणी 1.55 लाख, काळसे बागवाडी स्ट्रीट लाईट जोडणी 70 हजार, काळसे महारवाडी स्ट्रीट लाईट जोडणी 43 हजार, काळसे बागवाडी स्ट्रीट लाईट जोडणी 66 हजार, असरोंडी ग्रामपंचायत येथे स्ट्रीट लाईटब्रॅकेट 2.56 लाख हि कामे मंजूर करण्यात आली आहेत.


































































