कुडाळात साव्या माशांची मागणी वाढली

346

कुडाळात नदीतील मासे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल होत असून खवय्यांची खरेदीसाठी झुंबड उडत आहे. हे मासे चविष्ट असतात. शिवाय ते इतर हंगामात मिळत नसल्याने सध्या हे नदीतील मासे (सावे मासे) शहरात विक्रीसाठी उपलब्ध होताच खवय्ये खरेदीसाठी अक्षरशः तुटून पडत आहेत. या माशांना वाढती मागणी आहे.

सध्या वातावरणात प्रचंड प्रमाणात उष्णता वाढली आहे. त्यामुळे नदी, नाले, ओहोळ, तलाव आदींच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. जिल्ह्यातील नदी पात्रातील पाणी पातळी घटल्याने या नदी पात्रात मासेमारी केली जात आहे. नदी, ओहोळात मिळणा-या या माशांना सावे मासे म्हणून संबोधले जाते. समुद्रात मिळणा-या माशांपेक्षा या माशांना चव चांगली असते शिवाय इतर हंगामात ते मिळत नसतात. सध्या कुडाळ शहरात हे नदीतील मासे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल होत आहेत. सध्या या माशांची मागणी वाढती आहे. मरल, खवळा, काडई, मळवा, शेंगटी, ठिगूर, वाळयचे पात, बेला आदी विविध प्रकारचे सावे मासे सध्या विक्रीसाठी दाखल होत आहेत. कुडाळ नवीन बसस्थानक नजिक खवळा, मळवा, शेंगटी व अन्य काही प्रकारचे मासे मोठ्या प्रमाणात सकाळच्या सत्रात विक्रीसाठी दाखल होत असून ते खरेदी करण्यासाठी खवय्ये अक्षरशः तुटून पडत असतात.

आपली प्रतिक्रिया द्या