
हक्कभंग नोटीसला उत्तर देताना स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी त्यांची भूमिका हक्कभंग समितीकडे मांडली आहे. इतर राजकारण्यांनी जे भाषणात म्हटले तेच मी गाण्यात वापरले, मग मलाच का नोटीस आली, असा सवाल त्यांनी केला आहे.
कुणाल कामरा यांनी काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्य केले होते. सोशल मीडियावर हे गाणे प्रचंड व्हायरल झाले. त्यावरून भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत कुणाल कामराच्या विरोधात हक्कभंग मांडला. या नोटीसला कुणाल कामराने उत्तर दिले आहे. ते या नोटीसमध्ये म्हणतात की, माझ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाजात कोणताही व्यत्यय आलेला नाही.
z गाण्यात केवळ कलेचा वापर करीत व्यंगात्मक, टीकात्मक पद्धतीने मते मांडली आहेत. सभागृहाचा अवमान करणे किंवा सदस्यांना चिथावणी देण्याचा यामागे कोणताही हेतू नव्हता, असेही ते म्हणाले.