
दि कुर्ला नागरिक सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवाचा सांगता समारंभ व स्मरणिका प्रकाशन सोहळा कुर्ला येथील बंटस संघ सभागृहात नुकताच संपन्न झाला.
प्रख्यात शिवव्याख्याते व इतिहास अभ्यासक नितीन बानुगडे-पाटील यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. त्यांनी बँकेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक शिवाजीराव नलावडे, हिंदुस्थान बँकेचे चेअरमन गुलाबराव जगताप, बँकिंगतज्ञ सि.बा. अडसूळ आणि शिवकृपा पतपेढीचे अध्यक्ष गोरख चव्हाण आदी उपस्थित होते. या वेळी ‘वारी सोहळा-संतांचा’ या कार्यक्रमाचा उपस्थितांनी आनंद घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे अध्यक्ष तुकाराम धोंडे (पाटील), उपाध्यक्ष विनायक गाढवे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभंग तसेच सर्व संचालक मंडळाने परिश्रम घेतले.

























































