
कुवेत सरकारने मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात भाजपच्या दोन माजी कार्यकर्त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधातील निषेधात सहभागी झालेल्या परदेशी लोकांना अटक करून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण आखाती देशाचे कायदे त्यांना तशी परवानगी देत नाहीत, असे स्थानिक मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
सौदी अरेबियात प्रकाशित होणार्या अरब न्यूज या इंग्रजी भाषेतील दैनिक वृत्तपत्राने मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्यांविरोधात शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर निदर्शने करण्यात आली होती. यामध्ये सहभागी झालेल्या मात्र सौदी अरबचे नागरिक नसलेल्या परदेशी नागरिकांना ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
कुवेतने म्हटले आहे की आंदोलकांना त्यांच्या संबंधित देशांमध्ये पाठवले जाईल कारण त्यांनी देशाच्या कायदे आणि नियमांचे उल्लंघन केले आहे ज्यात असे नमूद केले आहे की आखाती राष्ट्रांमध्ये अन्य देशांचे नागरिक आंदोलने किंवा निदर्शने आयोजित करू शकत नाहीत किंवा त्यात सहभागी होऊ शकत नाही, असे त्यात म्हटले आहे.































































