Photo – ‘ला कासा डी पापेल’ लवकरचं येतोय आपल्या भेटीला…

कोरोनामुळे जगभरात मनोरंजनासाठी लोक मोठ्या प्रमाणात ओटीटी प्लॅटफॉर्मवर निर्भर होताना दिसत आहेत. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, ह़ॉटस्टार, झी 5 सारख्या अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मसवर प्रदर्शित झालेल्या वेब सीरिज आणि चित्रपट लोकांच्या पसंतीस पडत आहेत.
resize_2

अशातच स्पॅनिश भाषेत असणारी ‘मनी हाईस्ट’ ही वेब सीरिज सुरूवातीला फ्लॉप ठरली होती. मात्र नेटफ्लिक्सने ही सीरिज खरेदी केल्यानंतर ती जगप्रसिद्ध झाली आहे.

resize_4

नेटफ्लिक्सने ‘ला कासा डी पापेल’ म्हणजेच ‘मनी हाईस्ट’ या लोकप्रिय वेबसीरिजच्या पाचव्या आणि शेवटच्या सीजनची रिलीज डेट जाहीर केली आहे.

resize_3

मनी हाईस्टचे पहिले चारही सीजन प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. पाचव्या सीजनचा ट्रेलर 2 ऑगस्ट रोजी रिलीज झाला आहे. याच्या ट्रेलर रिलीजनंतर अनेकांची हा सीजन पाहण्याची उस्तुकता अधिकच वाढलेली दिसत आहे.

resize_6

ही वेब सीरिज दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे, पहिला भाग 3 सप्टेंबर 2021 तर दुसरा भाग 3 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.
resize_7

पाचव्या सीजनच्या कथानकात बॅंक ऑफ स्पेनमध्ये घातलेल्या दरोड्याचा शेवट दाखवला जाईल. “हा यापुढे दरोडा नाही. हे युद्ध आहे. ” असा संदेश प्रोफेसरने बॅंक मधील त्यांच्या सहकाऱ्यांना दिला आहे.
resize_8

हा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, ह्या सिजनमध्ये रोमांचकारी, अविश्वसनीय अॅक्शन, हाय व्होल्टेज ड्रामा आणि अनपेक्षित वळणे दिसणार आहेत.

resize_5

आपली प्रतिक्रिया द्या