‘पैसे आम्ही देतो’ म्हणणाऱ्या दिल्ली सरकारने मजुरांच्या तिकीटाचे पैसे मागितले, बिहारच्या मंत्र्यांचा गंभीर आक्षेप

1338

दिल्ली आणि बिहार या दोन राज्यांमध्ये मजुरांच्या रेल्वे तिकीटाच्या भाड्यावरून वादावादीला सुरुवात झाली आहे. बिहार सरकारच्या एका मंत्र्याने म्हटलंय की आधी दिल्ली सरकारने त्यांच्या राज्यात अडकलेल्या बिहारी मजुरांना परत पाठवण्यासाठी रेल्वे तिकीटाचा जो खर्च येईल तो आम्ही भरू असे सांगितले होते. मात्र आता दिल्ली सरकारने तिकीटासाठी झालेला खर्च भरून द्या अशी मागणी केली आहे.

या मजुरांच विविध राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यासाठी सगळी राज्य सरकारे प्रयत्न करत आहे. रस्ते मार्गाने मजुरांना परत त्यांच्या राज्यात पाठवणं शक्य नसल्याने रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या सोडाव्यात अशी जवळपास सगळ्या राज्यांनी मागणी केली होती. त्यानुसार मजुरांना त्यांच्या राज्यात नेण्यासाठी विविध राज्यातून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. दिल्ली सरकारने त्यांच्या राज्यात अडकलेल्या 1200 मजुरांना बिहारला पाठवण्यासाठीही गाडी सोडली होती.

बिहारचे मंत्री संजय कुमार झा यांनी म्हटलंय की मी दिल्लीच्या मंत्र्यांचं ट्विट वाचलं होतं, ज्यात त्यांनी म्हटलं होतं की आम्ही या मजुरांच्या रेल्वे तिकीटाचा खर्च उचलू. मात्र आता दिल्ली सरकारने आम्हाला एक पत्र पाठवलं असून त्यांनी या तिकीटाच्या खर्चाची भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. एकीकडे दिल्ली सरकार या मजुरांना आपण तिकीटाचा खर्च उचलून त्यांच्या राज्यात पाठवत असल्याचं श्रेय घेतात आणि दुसरीकडे तिकीटांच्या खर्चाची भरपाई मागतात असं झा यांनी दिल्ली सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेताना म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या