महिलेने ऑनलाईन मागवले सात हजारांचे स्पीकर्स, पार्सलमध्ये मिळाल्या पणत्या आणि लाडू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सध्या ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यात देण्यात येणाऱ्या भरघोस डिस्काउंटमुळे अशा साईट्सवर लोकं तुटून पडलेली असतात. पण, काहीवेळा या प्रक्रियेत चांगलीच फसगत होण्याची शक्यता असते. एका महिलेच्या बाबतीतही काहीसं असंच झालं आहे. सुमारे सात हजार रुपये किमतीच्या स्पीकर्सच्या बदल्यात तिला पार्सलमध्ये पणत्या आणि लाडू मिळाले आहेत.

अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वेबसाईटवरून महिलेने जेबीएल कंपनीचे स्पीकर्स मागवले होते. त्यासाठी तिने सात हजार रुपयेही भरले होते. मात्र, जेव्हा घरी आलेलं स्पीकरचं पार्सल तिने उघडून बघितलं आणि तिला धक्काच बसला. कारण, त्यात स्पीकरऐवजी दोन पणत्या आणि लाडू होते.

ते पाहून त्या महिलेने ट्वीट करून अॅमेझॉनला तक्रार केली. हे पार्सल पाहून मी गोंधळात पडले आहे, कारण मला समजत नाही की मी आधी लाडू खाऊ की आधी दिवे लावू, अशा शब्दांत तिने अॅमेझॉनकडे याची तक्रार केली आहे.  अॅमेझॉननेही तिच्या तक्रारीची दखल घेत तिला यात योग्य चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे.

summary- lady ordered speakers got diya and ladoo instead