
सामना ऑनलाईन । ठाणे
नाश्त्यावरून झालेल्या भांडणामुळे एका महिलेने तिच्या आत्याच्या डोक्यात १४ वेळा चाकू खुपसल्याची भयंकर घटना घडली आहे. स्वप्ना कुलकर्णी (39) असं या महिलेचं नाव असून ती ठाणे येथे राहते.
स्वप्ना ही बेरोजगार असून गेली अनेक वर्षं आपल्या ७५ वर्षीय आत्यासोबत राहत होती आणि आर्थिक गरजांसाठी ती आत्यावरच अवलंबून होती. शनिवारी सकाळी नाश्ता न बनवण्यावरून तिचा आत्याशी वाद झाला. या वादाचं रुपांतर मोठ्या भांडणात झालं. संतापाच्या भरात स्वप्नाने स्वयंपाकघरातील चाकूने तिच्या आत्याच्या डोक्यावर १४ वेळा वार केले.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी स्वप्ना हिला अटक केली. तिच्या आत्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
summary- lady stabbed elderly aunt for 14 times






















































