
सामना प्रतिनिधी, मुंबई
गेले चार दिवस सुरू असणारा पाऊस मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सातही तलावांत समाधानकारकरीत्या बरसत असल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. गेल्या चार दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्याने सोमकारी सकाळपर्यंत 1 लाख चार हजार 496 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे.
मुंबईला सध्या राखीव कोटय़ातून पाणीपुरवठा होत असताना तळ गाठलेल्या तलावांत पडणाऱया पावसामुळे आशावादी चित्र निर्माण झाले आहे. गेल्या तीन ते चार दिकसांपासून पाकसाने तलाक क्षेत्रात संततधार धरल्याने पाणीसाठा हळूहळू काढू लागला आहे. या वर्षी तलावांत कमी पाणीसाठा असल्यामुळे नोव्हेंबरपासून 10 टक्के पाणीकपात सुरू असून सध्या राखीव कोटय़ातून पाणीपुरवठा सुरू आहे.
पिण्यायोग्य पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
अप्पर वैतरणा –
राखीव साठय़ाचा कापर
मोडकसागर – 35205
तानसा – 11665
विहार – 4796
तुळशी – 3143
भातसा – 10637
(राखीव साठय़ाचा कापर)
मध्य वैतरणा – 39051
1 जुलै रोजीचा तीन वर्षांतील पाणीसाठा
2017 – 492022
2018 – 303278
2019 – 104496



























































