हर हर महादेवचा जयघोष, लाखो भाविकांची वैद्यनाथांच्या दर्शनासाठी गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाच्या नगरीत चौथ्या श्रावण सोमवारनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. देशभरातील विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.रविवारपासूनच मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता.

मंदिर परिसरात बेल-फुलांच्या दुकानावर गर्दी

महादेवाला बेल अधिक आवडत असल्याने आज बेल-फुलांना प्रचंड मागणी होती, वैद्यनाथ मंदिराकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर बेलाची पाने घेऊन विकण्यासाठी महिला, मुले, मुली आणि पुरुषही थांबले होते. सोमवार पहाटेपासूनच दर्शन रांगांमध्ये मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. दुपारपर्यंत दीड लाख भाविकांनी वैद्यानाथचे दर्शन घेतले.

वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन व्यवस्था काटेकोरपणे करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनीही मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दर्शन रांगेत कालपासूनच भाविकांची गर्दी पहावयास मिळत होती. तर आज सकाळी यामध्ये मोठी वाढ झाली. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी साधारणपणे दीड लाख भाविक भक्तांनी दर्शन घेतल्याचे वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले.