लालबागच्या राजाच्या रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद, 1585 बाटल्या केल्या दान

960

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केल्यानंतर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून 23 मार्च ते 1 एप्रिलपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल 1585 नागरिकांनी रक्तदान केले आहे.

या रक्तदान शिबीरात केईएम, जेज, नायर, कामा, सायन, वाडिया या रुग्णालयांनी भाग घेतला होता. तर गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या शिबीराला भेट दिलेली, अशी माहिती या मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या