ललित मोदी यांनी स्वीकारले ब्रिटनचे नागरिकत्व; म्हणाले, ‘युके हेच आता माझे घर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीगचे (IPL)माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी अधिकृतपणे ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारल्याची घोषणा केली आहे. १५ सप्टेंबर २०२६ रोजी आपल्याला ब्रिटनचे नागरिकत्व मिळाले असून, हा आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि वैयक्तिकदृष्ट्या महत्त्वाचा टप्पा असल्याचे मोदी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत मोदी यांनी सांगितले की, “युके हेच आता माझे घर! ब्रिटिश नागरिक होणे हा एक सन्मान आणि जबाबदारी आहे, ही जबाबदारी मी अभिमान, कृतज्ञता आणि खऱ्या आपुलकीच्या भावनेने स्वीकारत आहे,” असे मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

दरम्यान, आयपीएलशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीदरम्यान ललित मोदी हे २०१० मध्ये युकेमध्ये स्थायिक झाले होते. या घटनेच्या अनेक वर्षांनंतर त्यांनी आता अधिकृतपणे ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारले आहे.