ऐतिहासिक दिवस! लालकृष्ण अडवाणी यांची भूमीपूजनावर प्रतिक्रीया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माझ्यासाठीच नव्हे तर सर्व हिंदुस्थानींसाठीच हा ऐतिहासिक आणि भावनिक दिवस असल्याचे सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढून ‘जय श्रीराम’चा नारा बुलंद करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटले आहे.

राममंदिर भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येला लालकृष्ण अडवाणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अडवाणी म्हणाले, ‘हा माझ्यासाठीच नव्हे तर सर्व हिंदुस्थानींसाठी ऐतिहासिक आणि भावनिक दिवस आहे. 1990 साली सोमनाथ ते अयोध्या निघालेल्या राम रथयात्रेत अनेक जण उत्स्फूर्तपणे, एका ऊर्जेने आणि ध्येयाने सहभागी झाले होते. माझ्या नशिबाने या रथयात्रे वेळी मला अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.