लालूंना धक्का! जामीन वाढविण्यास न्यायालयाचा नकार

lalu-yadav

सामना ऑनलाईन । रांची

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्युटमध्ये उपचार सुरू असतानाच झारखंड उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन वाढवून देण्याचा अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायालयाने लालूंना ३० ऑगस्ट पर्यंत न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

चारा घोटाळा प्रकरणात दोषी सिद्ध झालेले लालू रांची येथील बिरसा मुंडा कारागृहात होते. मात्र, तब्येतीच्या कारणावरून त्यांना २७ ऑगस्टपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्युटमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांनी पुढिल उपचारासाठी आणखी तीन महिन्यांचा जामीन मिळावा म्हणून झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.\

SUMMARY : LALU PRASAD YADAV BAIL APPLICATION REJECTED BY JHARKHAND HIGHCOURT