संसर्ग वाढल्याने लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडल्याचं वृत्त आहे. लालू हे सध्या मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूट रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांचे पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सोमवारी ट्वीट करून लालू यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली.

तेजस्वी यांनी आपल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, एशियन हार्ट इन्स्टिट्युट, मुंबई येथे मी माझ्या वडिलांना भेटण्यासाठी आलो आहे. त्यांची तब्येत खालावली असून संसर्ग वाढल्याने मला त्यांची काळजी वाटत आहे. ते लवकर बरे व्हावेत, म्हणून मी प्रार्थना करत आहे, असं तेजस्वी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

चारा घोटाळा प्रकरणात दोषी सिद्ध झालेले लालू रांची येथील बिरसा मुंडा कारागृहात होते. मात्र, तब्येतीच्या कारणावरून त्यांना २७ ऑगस्टपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला आहे. तब्येत बिघडल्याने त्यांना आधी रांची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स येथे दाखल करण्यात आलं. तिथे महिनाभर उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. काही काळापूर्वी आपला मुलगा तेजप्रताप याच्या विवाहासाठी त्यांना जामीन मिळाला होता. त्यानंतर त्यांची तब्येत सातत्याने बिघडत आहे.

summery- lalu prasad yadav is ill