जमिनीच्या वादातून शेतातील पीक, साहित्य जाळले; सव्वाचार लाखांचे नुकसान

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात मौजे हिप्पळनेर येथे जमिनीच्या वादातून शेतातील पिके आणि साहित्य जाळण्यात आले. त्यात शेतकऱ्याचे तब्बल 4 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश भानुदास मंदाडे (वय 55, रा. हिप्पळनेर) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांचा रत्नाकर गणपती जाधव (रा.हिप्पळनेर) यांच्यासोबत चालू असलेल्या जमिनीच्या वादामधून त्यांनी जाणूनबुजून सूडबुध्दीने धुऱ्यावरील गवताला आग लावली.

यामुळे तक्रारदाराचे आणि त्यांच्या शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांचे शेतातील स्प्रिंकलर सेट, सोयाबीन, तुरीची गुळी, ऊस, हरभरा तसेच वेगवेगळया प्रकारची झाडे व एसडीपी पाईप, ठिबक लाईन असे सुमारे 4 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिसांनी रत्नाकर गणपती जाधव याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या