पुणे मेट्रोस शासनाकडून जमीन

30

सामना प्रतिनिधी, पुणे

पुणे शहरातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या हिश्शाच्या व्यवहार्यता तफावत निधी (व्हीजीएफ ग्रँट) रोखीने देण्याऐकजी जमिनीचे हस्तांतरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पीएमआरडीएकडून राबविण्यात येणाऱया हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान राबवण्यात येणाऱया पुणे मेट्रो- 3 या प्रकल्पाची एकूण किंमत 8,312 कोटी रुपये आहे. पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतन, दुग्ध विकास व पोलीस विभाग यांच्याकडून प्राधिकरणास जमिनी हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

कल्याण ते तळोजा मेट्रो मार्ग
एकूण लांबी – 20.75 कि. मी. असून हा संपूर्ण उन्नत मार्ग असेल. यामध्ये एकूण 17 स्थानके असतील.
प्रकल्पाची किंमत – 5 हजार 865 कोटी रुपये इतकी आहे. मार्च 2024 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात एमएमआरडीए व राज्य सरकार यांच्यासह सिडको आणि एमआयडीसी यांचाही सहभाग असणार आहे.

असा असेल मार्ग
कल्याण ते तळोजा या मेट्रोमार्गाला मेट्रो-5 ठाणे-भिवंडी-कल्याण, नवी मुंबई मेट्रो मार्ग आणि मेट्रो -12 कल्याण ते तळोजा यांचे एकात्मिकरण करण्याचेदेखील प्रस्ताकित आहे. कल्याण ग्रोथ सेंटर, नैना क्षेत्र, कल्याण-डोंबिवली ही शहरे नकी मुंबईला जोडण्याची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प आखण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या